अहो डॉक्टर.. अंगाला तेल मालिश करणे व वाफ घेणे हे देखील पंचकर्म आहे ना ? त्याविषयी तुम्ही सांगितलेच नाही ?

खरे पाहता त्यांचा समावेश पूर्वकर्म म्हणजेच पंचकर्मातील काही कर्म करण्यापूर्वी केला जातो .
फक्त तेल मालिश ( स्नेहन ) व वाफ ( स्वेदन ) असे स्वतंत्र देखील उपयोग केला जातो.
‘ मालिश-शेक म्हणजे पंचकर्म’ असे मात्र मुळीच नाही… पण….  त्याच्याशिवाय पंचकर्म चिकित्सा पद्धती अपूर्ण आहे.
उदा.
जसे एखादया ऑपरेशन पूर्वी रुग्णास हॉस्पिटल मध्ये एडमिट  केले जाते,
भूल दिली जाते आणि नंतर ऑपरेशन केले जाते, मग एडमिट करणे,भूल देणे याला ऑपरेशन केले असे म्हटले जात नाही.
त्याच प्रमाणे ह्याशिवाय ऑपरेशन देखील पूर्ण होत नाही.
त्याचप्रमाणे तेल मालिश म्हणजे "अभ्यंग " व वाफ घेणे म्हणजे "स्वेदन" होय.
ह्याच्या शिवाय पंचकर्म चिकित्सा पूर्ण होत नाही

Category: