पंचकर्म केव्हा करावे ?

स्वस्थ(ज्यांना काहीही त्रास नाही त्या) व्यक्तींनी ऋतू नुसार पंचकर्म करावे असे सांगितले आहे. जसे….
 

ऋतु ( मराठी महिने )

इंग्रजी महिने

शोधन अपेक्षित वृद्ध दोष

शोधन कर्म ( पंचकर्म )

वर्षा ( पावसाळा )

जुन जुलै

वात

बस्ती

शरद

ऑक्टोबर नोव्हेंबर

पित्त

विरेचन

रक्तमोक्षण

वसंत

मार्च एप्रिल

कफ

वमन

नस्य

पण… रुग्ण व्याधीग्रस्त असेल ….तर
त्या व्याधीनुसार, रुग्ण प्रकृती,बलानुसार वरील पंचकर्म अवस्थेनुसार कोणत्याही ऋतूत करता येते .
जसे काही पचायला जड तिखट तैलकट खाल्याने पित्त झाले तर मळमळ जाणवते अश्यावेळी उलटी झाली की बरे वाटते.
हा शरीराचा स्वतःचा प्रयत्न आहे वाढलेले दुष्ट पित्त बाहेर काढून टाकण्याचा…
त्यामुळे अश्या वेळी वमनाने ते पित्त फार सहज बाहेर पडते व आराम मिळतो…
अश्या परिस्थितीत अनुकुल ऋतु येई पर्यंत वाट बघायची गरज नसते… लगेचही करता येते.
 

Category: