पण आम्ही ऐकले होते पंचकर्म ७ दिवस केले जाते आणि तुम्ही तर काही तासांकरिता म्हणत आहात,नक्की काय ?

 दोन्ही गोष्टी बरोबर आहेत.पंचकर्म करण्यासाठी विशेष करून वमन व विरेचन ह्या कर्मांसाठी
काही दिवस म्हणजे ३-५-७ दिवस औषधी सिद्ध तेल किंवा तूप प्यावे लागते
त्याला 'स्नेहपान ' असे म्हणतात. स्नेह म्हणजे तेल,तूप इ.तर पान म्हणजे पिणे होय.
ते रोज ठराविक व वाढीव मात्रेत घ्यावे लागते त्यानंतर शरीरात विशिष्ट लक्षणे निर्माण झाली कि ते पिणे बंद करावे लागते.
त्यानंतर एक किंवा दोन दिवसाच्या अंतराने वमन किंवा विरेचन करावे लागते
स्नेहपान हे मात्र फक्त वमन व विरेचन कर्म (क्वचित रक्तमोक्षण ) यांच्या पूरते मर्यादित आहे
इतर नस्य व बस्ति कर्मांसाठी स्नेहपान करावे लागत नाही.
 

Category: