स्नेह्पान म्हणजे नक्की काय ?

डॉक्टर या स्नेह्पानामुळे नक्की काय होते? ते गरजेचे आहे का? कारण हल्ली तेलकट,तुपकट खाऊ नये असा सल्ला दिला जातो
आणि तुम्ही तर ते सरसकट प्यायला ते पण वाढीव मात्रेत घ्यायला सांगत आहात?

डॉक्टर:-

एकदम चांगला प्रश्न विचारला तुम्ही. खरे पाहता तेलकट/तुपकट खाणे हा प्रकार वेगळा म्हणजे भजी ,वेफर्स ,तररी(तेलकट रस्सा) इ. म्हणजे तेलकट/तुपकट खाणे होय. ते अयोग्यच आहे पण स्नेहपानात वापरले जाणारे तूप/तेल हे विविध औषधांपासून बनविलेले असते
 त्याचा उद्देश म्हणजे शरीरात ज्यामूळे व्याधी होतात ते "दोष(toxins)" पोटात आणणे होय.
ते लगेच येत नाहीत म्हणून ठराविक दिवस तेल /तूप प्यावे लागते व दोष कोष्ठात(पोटात) आले की त्यांना बाहेर काढावे लागते
म्हणजेच वमन,विरेचन औषधानी जुलाब करविणे होय. त्यामुळे हे तेल/तूप शरीरास हानिकारक नसते. ह्या विषयावर बरेच संशोधन झाले आहे. त्यामुळे अगदी ज्यांचे कोलेस्टेरोल वाढलें आहे त्यांना सुद्धा आम्ही स्नेहपान करून पंचकर्म केले आहेत व त्यामुळे त्यांना त्रास तर झाला नाहीच
पण उलट शरीर शुद्ध झाल्यामुळे त्यांची कोलेस्टेरोल लेव्हल सुद्धा नियंत्रित झाल्या आहे.
अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर  “गाडी सर्व्हिसिंग ला दिली कि ऑइल बदलावे लागते ना !”
 त्याचप्रमाणे इथे शरीराच्या सर्व्हिसिंगसाठी तूप प्यावे लागते.
 

Category: